परिस्थितीवर मात करत अनेकांनी यशाला गवसणी घातली असे अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील.
अशीच कहाणी पुण्यातील सांगवी गावात राहणाऱ्या कुस्ती पटूची आहे. कुस्ती खेळ खेळताना अनेक संकटाचा सामना त्याला करावा लागला.
घरी आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील त्याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिपध्ये सुवर्णं पदक मिळवले आहे.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती खेळणारा हाच पैलवान आता रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
View All Products
या कुस्ती पटूचे नाव सुमित भोसले आहे. तो मूळचा पुण्यातील सांगवी या गावातील आहे.
सुमितचे आईवडील शेती करायचे पण सध्या घरीच असतात. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यालाच घरातील सर्व गोष्टी पाहाव्या लागतात.
2005 पासून सुमितने कुस्ती खेळायला सुरुवात केली होती. यानंतर 2009 मध्ये सर्वात प्रथम पदक हे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत त्याला मिळालं.
आता रशियामध्ये फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णं पदक मिळवेल, अशी भावना देखील सुमितने व्यक्त केलीय.