आता फिंगरप्रिंट नाही तर श्वासाने अनलॉक होतील मोबाईल!

फिंगरप्रिंटने मोबाईल अनलॉक करण्याची पद्धत आता जुनी होऊ शकते. 

कारण भारतीय शास्त्रज्ञांनी एक नवा दावा केला आहे. 

आता श्वास घेऊनही फोन अनलॉक करता येऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. 

श्वासोच्छवासाच्या वेळी हवेत निर्माण होणारा वायु बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन मेथड म्हणून काम करु शकतो. 

याचा अर्थ स्मार्टफोन आणि इतर उपकरणे या टर्ब्युलन्सने अनलॉक करता येतात. 

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने महेश पंचगुला आणि टीमने हे संशोधन केलं आहे.

यासाठी टीमने एअर प्रेशर सेन्सरवरुन रेकॉर्ड केलेल्या श्वासोच्छवासाचा डेटा वापरला आहे. 

AI मॉडेलद्वारे श्वासोच्छवासातील टर्ब्युलन्स ओळखली जाते.

शास्त्रज्ञांच्या मते, हे AI मॉडेल 97 टक्के अचूकतेसह श्वासोच्छवासाची पडताळणी करतं.