राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण आलं! मिळालेल्या अक्षतांचं करायचं काय?

शेकडो वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर उभं राहिलंय अयोध्येचं भव्य राम मंदिर.

22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळ्यात या मंदिरात विराजमान होतील  भगवान श्रीराम.

त्यामुळे संपूर्ण देशात आहे उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण.

रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्येत यावं यासाठी काही हिंदू संघटना करत आहेत घरोघरी अक्षता वाटपाचं कार्य.

त्यामुळे अनेकजणांना निमंत्रण म्हणून मिळालेल्या अक्षतांचं करावं काय?  हा प्रश्न पडलाय.

जालन्यातील ज्योतिषी  राजेश महाराज सामणगावकर यांनी याचं उत्तर दिलंय.

त्यांनी सांगितलं, या अक्षता आपल्याजवळ सांभाळून ठेवा.

जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत त्या आपल्या देवघरात ठेवा. प्रभू श्रीरामांचं स्वरूप म्हणून त्यांचं नित्य पूजन करा.

जेव्हा कधी आपण अयोध्येला जाल तेव्हा या अक्षता सोबत घेऊन जा आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करा.

तर, 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी होईल. तेव्हा घरोघरी गुढ्या उभारण्याचं आवाहनही ज्योतिषांनी कलं आहे.