ज्वारीला दुष्काळाच्या झळा! 

मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे याचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, आणि वाशी तालुक्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

मात्र, यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय.

दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेलं ज्वारीचे पीक पाण्याअभावी कोमेजून जातेय.

कोमेजलेलं ज्वारीचे पीक पाहिलं की आपोआप दुष्काळाची जाणीव होतेय. त्यामुळे ज्वारीचे उत्पन्न घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे.

सध्या ज्वारीचे पीक सध्या हुरड्याच्या अवस्थेत आहे म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र मराठवाड्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडलाय.

त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातही खरीप हंगामात नद्या, विहिरी कोरड्या ठाक होत्या आणि याचाच परिणाम आता ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय.

सध्या ज्वारीचे पीक कणसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

परंतु विहिरींना, नद्यांना आणि तलावांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारीला पाणी देता येत नाही किंबहुना दुष्काळाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय.

माजी सैनिक करतोय शेळीपालन!