लाडक्या महाराष्ट्र केसरी बैलाची बांधली समाधी

लाडक्या महाराष्ट्र केसरी बैलाची बांधली समाधी

बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जीव की प्राण असून बैलगाडा मालक पोटच्या मुलांप्रमाणे बैलांचा सांभाळ करतात. 

पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात बैलगाडा शर्यतीसाठी बैलांची देखभाल केली जाते. 

नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. 

नुकतंच बैलगाडा शर्यतीत जिंकल्यावर खंड्या बैलाचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. 

आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

घाटाचा राजा असणाऱ्या खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना रितसर दशक्रिया विधी करण्यात आला.

 जाधव यांनी आपल्या लाडक्या बैलाच्या स्मृती जपण्यासाठी घराशेजारी त्याची समाधी बांधली आहे. 

खंड्याने अनेक विक्रम करताना रांजणगाव, लोहगाव सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या. 

त्यामुळेच खंड्याला महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा  म्हणून ओळखलं जात होतं. 

आता आई-वडिल म्हणतील 'मावळा' खेळा