‘इथं’ उभी राहतीय तब्बल 5 हजार वृक्षांची आमराई

आपल्या शहरात एखादं निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर हिरवाईनं नटलेलं ठिकाण सुखद अनुभव देणारं असतं.

त्याचसाठी जालना शहरातील पारसी टेकडी पर्यटनासाठी विकसित केली जातेय.

शहरातील काही सजग नागरिक, काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या टेकडीचा विकास होत आहे.

तब्बल 5 हजार झाडांची आमराई या ठिकाणी तयार होतेय.

जालन्यातील विकास कामांमध्ये केशव सृष्टी फाउंडेशन मोलाचे योगदान देत आहे. तब्बल 5 हजार आंब्यांच्या आमराईची भर आता पारसी टेकडीवर पडणार आहे.

आतापर्यंत लागवड झालेल्या 60 हजार वृक्षांच्या उपक्रमात 5 हजार आंब्याच्या बागेची भर पडणार आहे.

ही बाग जगवण्यासाठी ठिबक, सुरक्षा कवच, मल्चिंग पेपरसह बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे.

माजी सैनिक करतोय शेळीपालन!