वय अवघं साडेचार वर्ष अन् सर केले 103 किल्ले!

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म झाला, जगायला आणि काय कारण हवं…या पावन भूमीत जन्म घेऊन आपलं पूर्ण जगणंच सार्थक झालंय.

हीच बाब लक्षात घेऊन अनेक आई-वडील आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिवरायांच्या सुवर्ण इतिहासाचं बाळकडू देतात.

समुद्रकिनारी निवांत बसून सुर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना पराक्रमांनी आजही धगधगणाऱ्या त्या गड, किल्ल्यांच्या भिंतींचा सहवास देतात.

तेही आजच्या अशा परिस्थितीत ज्यात मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणं म्हणजे आई-वडिलांसाठी मोठा टास्क असतो.

त्यामुळे साडेचार वर्षांच्या आयांश ढवळेचं तर खरोखर कौतुक आहे.

या चिमुकल्यानं 1 नाही 2 नाही, तर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील तब्बल 103 किल्ले सर किल्ल्यांची भ्रमंती केली आहे.

शिवाय आता तो 100हून अधिक किल्ले सर करणारा आशियातला सर्वात तरुण व्यक्ती ठरलाय.

‘सर्वात लहान दुर्गवीर’ अशी ओळख त्याला मिळाली आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणतात ते हेच.

त्याच्या या विक्रमाची नोंद आता थेट ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.

गावातील पोरगा रशियात कुस्तीचा आखाडा गाजवणार