अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचा विश्वविक्रम

अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचा विश्वविक्रम

एखादा छंद माणसाला जागतिक पातळीवर खास ओळख बनवून देऊ शकतो. 

असाच एक विक्रम वर्ध्यातील अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने केलाय. 

चार्वी गरपाळ असं चिमुकलीचं नाव असून तिच्या कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.

'पर्यावरण श्लोक माला' या विषयावर चार्वीने संस्कृत भाषेत 52 श्लोकांचा हिंदी अनुवाद केलाय. 

तसेच 'पर्यावरण श्लोक माला' या नावाचे पहिले पुस्तक 26 जानेवारी रोजी प्रकाशित होत आहे.

सर्व संस्कृत श्लोकांचे उच्चार शिकविण्यासाठी अमृता खंडेराव यांनी चार्वीला मार्गदर्शन केले आहे

चार्वी नृत्य, गायन, खेळ, पाठांतर, योगाभ्यास, जिम्नॅस्टिक, नाट्यकला अशा अनेक विषयात पारंगत आहे. 

अभ्यासाव्यतिरिक्त तिने अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये प्राविण्य आणि बक्षिसे मिळविली आहेत. 

संक्रांतीनंतर का करतात नदी संगमावर स्नान?