शनी वर्षभर 'इथंच' ठाण मांडून बसणार; 'या' राशींची चांदी होणार 

ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना मानलं जातं न्यायदेवता. त्यांच्या स्थानामुळे होऊ शकतो भाग्योदय आणि अधोगती.

ज्योतिषी पंडित पंकज सांगतात, शनीला क्रूर, पापी ग्रह मानतात. कुंडलीत त्याचं स्थान असेल अशुभ, तर व्यक्तीला अडचणींचा करावा लागतो सामना.

मात्र असं नाहीये की, शनी केवळ अशुभ फळ देतो. तो जेव्हा शुभ फळ देतो, तेव्हा इतकं सुख मिळतं की, ओंजळीत मावता मावत नाही.

यंदा अनेक राशींसाठी शनीचं स्थान असेल शुभ. कारण वर्षभर शनी कुंभ राशीतच असेल विराजमान.

मेष : आपल्यासाठी हे पूर्ण वर्ष सुखाचं आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मित्र-मंडळींसोबत नातेसंबंध चांगले राहतील. दाम्पत्य जीवनात सुख येईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. अनेक शुभ कार्य घडतील.

वृषभ : नोकरीत नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापार विस्तारेल. घरात शांतता येईल. धनलाभ होईल. दाम्पत्य जीवन सुखाचं राहील. नवं काम सुरू करू शकाल.

मिथुन : नोकरीत प्रगती होईल, सर्वांकडून शाबासकी मिळेल. घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं. धनसंपत्ती वाढेल. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. सगळीकडून आपल्याला लाभ होईल.

सिंह : घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं. मित्राच्या साथीने आपली प्रगती होईल. आरोग्यासंबंधित व्याधींपासून सुटका मिळेल. मन शांत राहील. आर्थिक बाजू भक्कम होईल. वैवाहिक जीवनात सुख येईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)