प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मच्छीमार जाणार

भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्लीत मोठा सोहळा असतो.

येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्याचं देशभरातील लोकांना आकर्षण असतं.

यंदा महाराष्ट्रातील 16 मच्छीमार दाम्पत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे.

यात जालना जिल्ह्यातील मेंढरे दाम्पत्याचाही समावेश आहे.

दिल्लीतील सोहळ्यात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचं रत्नाकर मुकुंदराव मेंढरे आणि त्यांच्या पत्नी गंगासागर मेंढरे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध घटकातील व्यक्तींना आमंत्रित केले जाते.

याच क्रमात समुद्रात, नदी, तलावात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमार बांधवांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत केलंय.

महाराष्ट्रातून 16 दाम्पत्यांना हे निमंत्रण देण्यात आले असून यामध्ये जालना जिल्ह्यातील सोमठाणा (ता. बदनापूर) येथील मेंढरे दाम्पत्याचा समावेश आहे.

अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचा विश्वविक्रम