शिक्षक कन्येला कसं मिळालं दीड कोटींचं पॅकेज?

जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर कोणतंही स्वप्न नक्की पूर्ण करता येतं. मराठवाड्याची कन्या शुभदा पैठणकर हिनं हेच दाखवून दिलंय.

शिक्षक कन्या असणाऱ्या शुभदाचं सुरुवातीचं शिक्षण गावातल्या मराठी शाळेत झालं.

पण आता आपल्या कर्तृत्वानं तिनं सातासमुद्रपार अमेरिकेत नाव कमावलंय.

शुभदा संजय पैठणकर ही मूळची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहे.

शुभदाचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. शुभादाने भोकरदन येथे 10 पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

त्यांनतर तिनं 11 आणि 12 वी छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण केलं.

पुढे संभाजीनगर शहरातील एका इंजिनिअरिंग कॉलेज मधून तिनं इंजीनियरिंग शिक्षण देखील पूर्ण केलं.

त्यांतर सिलिकॉन व्हॅली येथे असलेल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्लाऊड अँड वर्चलायझेशन’मध्ये तिनं शिक्षण घेतलं.

आता तिला अमेरिकेतील एका नामांकित कंपनीची नोकरी मिळाली असून त्या ठिकाणी दीड कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे, असं शुभदानं सांगितलं.

अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचा विश्वविक्रम