तोंडाचा येतो वास?  3 पदार्थ वापरा, येईल सुगंध!

कितीही वेळा केला ब्रश, नको-नको त्या वापरल्या पेस्ट, तरी तोंडाचा दुर्गंध काही केल्या जात नाही?

अनेकजण स्वत:च्या तोंडाच्या वासानेच होतात हैराण, तर काहीजणांना दुसऱ्यांच्या तोंडाच्या वासाने होते डोकेदुखी.

आपल्यामुळे कोणालाही होऊ नये त्रास म्हणून यावर आजच करा उपाय.

आयुर्वेदिक डॉक्टर रितेश सांगतात...

घरगुती उपचारांनी तुम्ही मूळापासून दूर करू शकता तोंंडाची दुर्गंधी.

त्यासाठी जास्त काही करायचं नाहीये, फक्त मोहरीच्या तेलात मीठ आणि हळद मिसळायचीये.

या मिश्रणाने दात आणि हिरड्यांना करा मसाज.

सकाळी आणि रात्री ब्रश केल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता.

यामुळे केवळ दुर्गंधी पळणार नाही दूर, तर दातदुखीही होईल बरी. शिवाय संपूर्ण तोंड राहील सुदृढ.