मनोज जरांगे 

एकट्यानं हलवलं सरकार

महाराष्ट्राच्या बाहेरही मनोज जरांगे प्रसिद्धी झोतात आहेत. त्यांच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.

 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.

20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज जरांगे-पाटील यांचं आंदोलन सुरू झालं होतं.

ते मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे रहिवासी आहेत.

मात्र, ते आपल्या कुटुंबासह जालना येथे राहतात.

वर्ष 2010 मध्ये जरांगे हे 12 वीत शिकत होते.

त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलं

शिक्षण बंद झाल्यानंतर ते सक्रियपणे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करू लागले.

उदरनिर्वाहासाठी ते हॉटेलमध्ये काम करत होते.

2016 ते 2018 पर्यंत मराठा आरक्षण आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले.

मनोज जरांगे-पाटील यांची ‘शिवबा’ नावाची संघटनाही आहे.