गेल्या 10 वर्षात भारताचं हवामान किती बदललं? 

भारताचं बदलतं हवामान तुम्हालाही जाणवतच असेल. 

गेल्या 10 वर्षातील बदलत्या हवामानामुळे सर्वांनाच हैराण केलंय. 

जिथे पाऊस पडत नव्हता तिथे अपेक्षापेक्षा अधिक पाऊस पडला. 

थिंक टॅंक कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अॅंड वॉटर च्या अभ्यानुसार हा दावा करण्यात आला आहे. 

अभ्यासानुसार, 10 वर्षात देशातील 55 टक्के उपजिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक वाढलं आहे.

यामध्ये राजस्थान, गुजरात मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या भागांचा समावेश आहे. 

यापैकी जवळपास एक चतुर्थांश तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 30 टक्के जास्त पाऊस पडला. 

अभ्यासासाठी, 4500 हून अधिक तहसीलमधील 40 वर्षांच्या हवामानाचे विश्लेषण करण्यात आले. 

यावेली गेल्या 10 वर्षात मान्सूनच्या पॅटर्नमध्ये अनियमित बदल झाल्याचं समोर आलं.