बैलाच्या किमतीती येईल मर्सिडीज

बैलाच्या किमतीती येईल मर्सिडीज

बैलाच्या साह्याने होणारी शेती मागे पडल्याने अलिकडे बैलांची संख्याही घटली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी प्रदर्शनात एक खिलार बैलानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

6 फूट उंचीच्या धिप्पाड सोन्याची सर्वात उंच बैल म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकात ख्याती आहे.

मुळचा सांगली जिल्ह्यातील असणारा सोन्या बैल विविध कृषी प्रदर्शनांत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेतोय. 

शेतकरी विद्यानंद आवटी आणि त्यांचे कुटुंबीय सोन्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतात. 

चार वर्षे वयाच्या सोन्याच्या किमतीत मर्सिडिज येऊ शकते. कारण त्याची किंमत 45 लाखांच्या घरात आहे.

पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या सोन्याचा खुराकही तसाच असून रोजचा खर्च 2 हजार रुपयांपर्यंत आहे. 

या बैलाचा मुख्य वापर ब्रिडिंगसाठी करण्यात येतो. दिवसाला 10 हजारापर्यंत कमाई होते. 

ठाकरेंच्या टीमचं मोठं यश, शोधली नवी प्रजाती