एकाच गोष्टीमुळे वाचू शकतात केस, घरातच असते ती!

घनदाट, मऊ, चमकदार, लांबसडक केस कोणाला नाही आवडत...

सध्याच्या धावपळीच्या, प्रदूषणाच्या आयुष्यात केसगळतीसोबत चमकही जाते निघून. 

त्यामुळे केसांची काळजी घेणं आहे अत्यंत आवश्यक.

केवळ काळजीच वाचवू शकते केस, परंतु ती घ्यावी तरी कशी?

यावर उपाय आहे सोपा. अगदी आपल्या आजीबाईच्या बटव्यातला.

तुळशीची पानं, आवळा आणि नारळाचं तेल केसांसाठी असतं अत्यंत गुणकारी. 

आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता श्रीवास्तव सांगतात... 

तुळशीची पानं धुवून सुकवावी. त्यात नारळाचं तेल मिसळावं. त्यातच आवळ्याची पावडर घालून एक पेस्ट तयारी करून घ्यावी. 

ही थंडगार पेस्ट हळूवारपणे केसात लावावी. अर्ध्या तासाने केस थंड पाण्यानेच धुवावे.

आठवड्यातून दोनवेळा हा उपाय केल्यास केस होतील सुंदर आणि समस्या पडतील गळून.