जीवनात उपयोगी पडतील चाणक्यच्या या 6 गोष्टी

जीवनात उपयोगी पडतील चाणक्यच्या या 6 गोष्टी

चाणक्य नीतिनुसार, ज्याचं ज्ञान पुस्तकातचं मर्यादित आहे, प्रत्यक्ष व्यवहारात वापरलंच जात नाही. अशा व्यक्तींचं ज्ञान आणि संपत्ती निर्थक आहे.

चाणक्य नितीनुसार आयुष्यात आदर असणं महत्वाचं आहे. अपमानात आयुष्य जगण्यापेक्षा मरणं बरं.

मरण एक क्षणचं असतं. पण, अपमानित जीवन जगणाऱ्या माणसाला रोजच त्रास सहन करावा लागतो. म्हणून आपल्या सन्मानची काळजी घ्या.

चाणक्य म्हणतात की या जगाच्या झाडावर दोन गोड फळं आहेत. एक फळ गोड शब्द आणि दुसरं सत्संग. या दोन फळांनी जीवनात गोडवा कायम राहतो.

चाणक्य निती म्हणते की जो माणूस भविष्यातील घटनांची तयारी करतो आणि कोणत्याही परिस्थितीत हुशारीने वागतो. अशा दोन्ही प्रकारातले लोक आनंदी राहतात.

नशीबावर विसंबणारा माणूस सुखाने जगू शकत नाही. केवळ नशिबावर अवलंबून राहणारा माणूस उद्ध्वस्त होतो.

चाणक्य नीति म्हणते की दुसर्‍यांच्या प्रगतीवर जळणारे दृष्ट लोक इतरांबद्दल अपशब्द बोलतात कारण, त्यांची काहीही करण्याची कुवत नसते.

चाणक्य नितीनुसार,आपल्या घरातील लोकांबद्दल जास्त आसक्तीही चांगली नाही.

अशा लोकांच्या वाट्याला भीती आणि दुःखच येतं. आसक्तीच दु:खाचं मूळ आहे. ज्याला आनंदी राहायचे आहे त्याने आसक्ती सोडावी.

गरज असताना एक-दोनदा खोटं बोलणं ठिक आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीवर आणि अनेकदा खोटं बोलणाऱ्या लोकांपासून तुम्ही अंतर ठेवावे.

असे लोक तुम्हाला कधीही मोठ्या संकटात टाकू शकतात. तसेच कोणाच्याही समोर तुमचा अपमान करू शकतात.