गूळ रात्री झोपताना खा, होईल खूप फायदा!

हिवाळ्यात हेल्थी आणि फिट राहायचं असेल, तर आरोग्याची काळजी घेणं आहे आवश्यक.

वातावरण बदलामुळे जडतात साथीचे आजार. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीची असते नितांत गरज.

थंडीत शरीर सुदृढ राहावं, यासाठी पाहूया एक घरगुती रामबाण उपाय.

हा उपाय म्हणजे गूळ.  ज्याचा एक लहानसा खडा जरी तोंडात टाकला तरी थकवा होतो क्षणात दूर.

गुळात मोठ्या प्रमाणात असतं आयर्न. ज्यामुळे रक्तातल्या पेशी सुदृढ राहण्यास मिळते मदत.

आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता श्रीवास्तव सांगतात की, गुळात केवळ आयर्न नाही, तर कॅल्शियमसह असतात अनेक व्हिटॅमिन्स.

त्यामुळे गूळ अन्नपचन सुरळीत होण्यास ठरतं फायदेशीर. त्वचा होते तुकतुकीत. सर्दी, तापावरही मिळतो आराम.

हृदयाच्या आरोग्यासाठी गूळ असतं फायदेशीर. महत्त्वाचं म्हणजे यामुळे वजनही राहतं नियंत्रणात.

दररोज रात्री जेवणानंतर 20 ग्रॅम गूळ खाणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर.