गोड असलं तरी मधामुळे वजन होतं सहज कमी!

मधामुळे जिभेला चव येतेच, तसंच ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतं.

विशेषतः थंडीत सर्दी, खोकल्यावर मध रामबाण मानलं जातं. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

मधात अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबायलसह विविध गुणधर्म असतात. ज्यामुळे शरिरावरील जखमा लवकर भरून निघतात.

आल्याचा रस मिसळलेलं मध खाल्ल्यास घश्याची खवखव दूर होते. मधामुळे त्वचा मऊ होते, त्वचेवरील डागही कमी होतात.

सकाळी उपाशीपोटी साध्या पाण्यात चमचाभर लिंबू पिळलेलं मध प्यायल्यास शरिरातली चरबी कमी होते. शिवाय पचनासंबंधित सर्व अडचणी दूर होतात.

अन्नपचन व्यवस्थित झाल्याने अर्थातच बद्धकोष्ठता, गॅस अशा समस्या होत नाहीत. शिवाय वजनही होतं कमी.

मध चुकूनही गरम करून किंवा गरम पाण्यातून घेऊ नये, त्यामुळे समस्या होऊ शकतात.

उत्तराखंडच्या आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली आहे.