जळजळ रोखण्यासाठी पोहे खाण्याची योग्य पद्धत

जळजळ रोखण्यासाठी पोहे खाण्याची योग्य पद्धत

नाश्त्यासाठी सर्वात हलकाफुलका आणि पटकन बनणारा पदार्थ म्हणजे पोहे होय. 

बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यानंतर अपचन, जळजळ अशा गोष्टींचा देखील सामना करावा लागतो. 

पोहे खाण्याच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे या पोह्यांमधील पोषक घटक शरीराला मिळतच नाहीत. 

पोहे खाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती दिलीय.

खरंतर पोहे खाताना आपल्याला त्यावरून बारीक शेव, किसलेले खोबरे असे घटक दिले जातात. 

पण पोहे खाताना लिंबूची एक फोड सक्तीने खावी. ती पोह्यातील पोषक घटकांसाठी उपयुक्त ठरते. 

पोह्यातील लोह शरीराने शोषून घेण्यासाठी त्याला 'विटामिन सी'ची साथ आवश्यकता असते. 

लिंबूमधून मिळणारे व्हिटॅमिन सी आपल्या रोगप्रतिकारशक्ती, पचन संस्था, त्वचेसाठी आवश्यक असते. 

जेव्हा विटामिन सी आणि लोह एकत्रित शरीरात जातात, तेव्हाच आवश्यक पोषणमूल्ये शरीरास चांगली मिळतात. 

गूळ रात्री झोपताना खा, होईल खूप फायदा!