तरुणी हसू किंवा रडू शकत नाही, पण कारण काय?

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या पॉला पायवा हिला एक विचित्र आजार आहे. 

26 वर्षांची पॉला ना हसू शकते ना रडू शकते. 

पॉला तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही भावना व्यक्त करु शकत नाही. 

पॉलाच्या चेहऱ्यावरील नसा काम करत नाही. त्यामुळे तिचे डोळे तोंड बंद होऊ शकत नाही. 

पॉलाला मोबियस सिंड्रोम नावाचा आजार आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अर्धांगवायू होतो. 

पॉलाला हा आजार जन्मापासूनच आहे. त्यामुळे तिचं जगणंही कठिण मानलं जायचं.

बऱ्याच टेस्ट केल्यानंतर पॉलाल मोबियस सिंड्रोमचं निदान झालं. 

पॉला सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

पॉलाला ज्या आजारानं ग्रासलं आहे तो 40 लाखांपैकी एकाला होतो.