हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरी

हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरी

सध्या मुंबईतील मार्केटमध्ये हँडक्राफ्ट ज्वेलरीचे फॅड महिलांमध्ये पाहायला मिळत आहे.

दादरच्या शिवाजी पार्क फेस्टिवल 2024 मध्येही या ज्वेलरीच्या स्टॉलवर गर्दी दिसली.

मोडासच्या युनिक हँडक्राफ्ट ज्वेलरीला मुंबईतील मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. 

आरती मटकर व पूर्वी मेहता या दोघी मिळून मोडास ब्रँड चालवतात. 

या ठिकाणी टेराकोटा, हँडपेंट केलेले विविध नेकलेस प्रकार आणि चोकर प्रकार खरेदी करता येईल. 

वारली पेंट असलेले बांबू ज्वेलरी, ग्लास पेंटिंग केलेले बीड्स व फॅब्रिकपासून तयार केलेल्या ज्वेलरीही मिळतात.

पारंपरिक दागिने वापरून कंटाळा आल्यास युनिक हँड क्राफ्ट ज्वेलरी फक्त 300 रुपयांपासून मिळतात. 

टेराकोटा क्लेपासून हॅन्ड क्राफ्ट दागिने तयार होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. 

मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल