‘इथं’ स्वस्तात खरेदी करा मोबाईल कव्हर

‘इथं’ स्वस्तात खरेदी करा मोबाईल कव्हर

सध्याच्या काळात मोबाईल ही जणू काळाची गरज बनली आहे. आपल्या गरजेनुसार प्रत्येकजण मोबाईल घेत असतो.

मोबाईल कोणताही असो तो चांगला दिसावा आणि सुरक्षित राहावा यासाठी मोबाईल कव्हर आवर्जून वापरला जातो.

आपल्या मोबाईलचा कव्हर युनिक आणि हटके असावा असा सर्वांचा प्रयत्न असतो.

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरात अशाच कव्हरची होलसेल दुकाने आहेत. जिथं केवळ 50 रुपयांपासून मोबाईल कव्हरच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत.

या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या मोबाईलचे कव्हर मिळतात. तसेच विविध डिझाईन आणि क्वालिटीचे कव्हरही या ठिकाणी उपलब्ध आहेत.

याची किंमतही अगदी परवडाणी आहे. 50 ते 1500 पर्यंत कव्हर या ठिकाणी उपलब्ध आहेत.

प्लेन मोबाईल कव्हर, राजस्थानी डिझाईन कव्हर, हॅलो किटी कव्हर, मॉम डॅड नाव आसलेले मोबाईल कव्हर, फ्लिप मोबाईल कव्हर या ठिकाणी मिळतात.

डिझायनर मोबाइल कव्हर, कार्टून मोबाईल कव्हर, स्टँड असलेलं कव्हर, असे प्रकार ही मिळतात.

मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल