IPL मधून किती कमावतो यशस्वी जयस्वाल?

यशस्वी जयस्वाल भारत-इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये आपल्या बॅटिंगने कमाल करत आहे.

यशस्वीने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये द्विशतक ठोकले.

सध्या क्रिकेटविश्वात यशस्वीवर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी यशस्वी हा सर्वप्रथम आयपीएलमुळे प्रकाशझोतात आला होता.

क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी करणारा 22 वर्षांचा यशस्वी आयपीएलमधून नेमके किती पैसे कमावतो हे जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये 625 धावा केल्या होत्या.

आयपीएल 2023 मध्ये त्याने 1 शतक तर 5 अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली होती.

यशस्वी 2020 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला तेव्हा त्याला 2.40 कोटी मिळाले होते.

2021 मध्ये देखील यशस्वीने आयपीएलमधून 2.40 कोटींचीच कमाई केली.

तर 2022 मध्ये यशस्वी जयस्वालने आयपीएलमधून 4 कोटी रुपयांची कमाई केली होती.

2023 मध्ये यशस्वी जयस्वालला आयपीएल खेळण्यासाठी 4 कोटी रुपये मिळाले होते.

यशस्वीने आतापर्यंत आयपीएलमधून 12 कोटी 80 लाखांची कमाई केली आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा