लिंबू आणि संत्र्यापेक्षाही गुणकारी फळ, डेंग्यूमध्ये खावंच!

आंबट पदार्थ अनेकजणांना आवडतात, ते शरिरासाठी काही प्रमाणात पौष्टिकही असतात.

चवीला आंबट-गोड असलेलं हे किवी फळ तर अनेक पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण असतं.

तोंडात टाकल्या टाकल्या गिळावं इतकं ते चवीला भारी लागतं.

दररोज किवी खाल्ल्याने शरिराचं आजारांपासून संरक्षण होतं.

किवीमध्ये सी, ई, के व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम असतं.

व्हिटॅमिन 'सी'चं प्रमाण लिंबू आणि संत्र्यापेक्षा किवीमध्ये जास्त असतं.

डेंग्यूच्या रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो.

या फळामुळे पेशी वाढण्यासही मदत मिळते.