Snake : साप कशी शिकार करतात? 

किंग कोब्रा सारखा साप सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. 

पृथ्वीवर सापांच्या 3000 हून अधिक प्रजाती आहेत. 

त्यापैकी फक्त 600 विषारी आहेत. तुम्ही कधी विचार केलाय का साप कशी शिकार करतात? 

किंग कोब्रा असो किंवा कोणताही साप, शिकारीसाठी ते वासावर अवलंबून असतात. 

साप त्यांची काटेरी जीभ वारंवार हवेत हलवून वास ओळखतात. 

इनलॅंड तैपनसह अनेक सापांच्या डोळ्यांसमोर छिद्र असतात. 

या छिद्राच्या सहाय्याने ते गरम रक्ताच्या प्राण्यांना ओळखतात. 

जेव्हा शिकार जवळ येते तेव्हा त्यांच्या जबड्याची हाडे कंप पावतात. 

साप त्यांच्या डोक्याच्या रुंदीपेक्षा तिप्पट मोठे प्राणी खाऊ शकतात.