मिरची लागवडीतून शेतकरी लखपती 

 मिरची लागवडीतून शेतकरी लखपती 

यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत.

मात्र, यवतमाळच्या करंजी येथील शेतकरी मनोज नंदूरकर यांना कापसामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळतं नव्हतं म्हणून मिरची लागवड केली.

त्यांचा हा मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.

यवतमाळच्या करंजी येथील शेतकरी मनोज नंदूरकर यांनी बरीच वर्षे फक्त कापूसाचे उत्पन्न शेतात घेतलं. मात्र पाहिजे तसा फायदा त्यांना या शेतीतून मिळत नव्हता.

त्यामुळे त्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि 6 ते 7 वर्षांपूर्वी सुरुवातीला 1 एकर वर मिरची लागवड केली.

सर्व खर्च काढून लाखोंचा नफा त्यांना मिळताना दिसला.

त्यामुळे मिरचीचे क्षेत्र वाढून यावर्षी देखील त्यांनी 4 एकर वर मिरची लागवड केलीय. 

या वर्षी मिळणाऱ्या दरावर नफा अवलंबून असला तरी 1 ते दीड लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

3 फुटाच्या देशी गाईचं दूध 300 रुपये लिटर