व्हॅलेंटाईन डे साठी 50 रुपयांपासून खरेदी करा गिफ्ट 

व्हॅलेंटाईन डे मध्ये प्रेमात पडलेल्या सर्वांचीच आपापल्या प्रिय व्यक्तीला स्पेशल गिफ्ट देण्याची तयारी सुरू असते.

प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचे त्याच्या अनेक गिफ्ट आयडियाज आपण शोधत असतो.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीला स्वस्तात अगदी मस्त असे काही छान युनिक आणि क्रियेटिव्ह गिफ्ट कुठे खरेदी करता येतील याची माहिती देणार आहोत.

पुण्यातील पिंपरीचिंचवड या ठिकाणी एका दुकानात आपल्याला 50 रुपयांपासून ते 2000 रुपये किंमती पर्यंतचे आकर्षक आणि सुंदर शो पीस मिळतील.

यात काचेचे, लाकडी हार्ट शेपचे शोपीस मिळतील. पार्टनरसमोर हृदयातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही हे खास मॅसेज लिहलेले शो पीस गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

यात तुम्हाला क्रिस्टल, सिल्वर कपल, स्टोन कपल, हर्ट शेप गिफ्ट, फोटो फ्रेम, प्रपोजल स्टेच्यू, असे गिफ्ट कमीत कमी म्हणजेच 50 रुपयांपासून पुढील किंमतीत या ठिकाणी तुम्हाला मिळतील.

या गिफ्टवर तुम्ही तुमच्या पार्टनरचे नाव देखील टाकून घेऊ शकता.

'इथं' खरेदी करा 100 रुपयांपासून पैठणी पर्स