साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 फेब्रुवारी

Floral Pattern
Floral Pattern

मेष : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्या-वागण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवावं लागेल. असं न केल्यास तुमची कामं विस्कळीत होऊ शकतात.अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो; पण सुखसोयी आणि चैनीच्या गोष्टींवर जास्त खर्च होईल.

Floral Pattern
Floral Pattern

वृषभ: इतर व्यक्तींवर आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमध्ये कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहावं. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला छोट्या कामासाठीदेखील धावपळ करावी लागू शकते.

Floral Pattern
Floral Pattern

मिथुन : आठवड्याचा उत्तरार्ध शुभ आणि लाभदायक असेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. बढती किंवा बदलीची इच्छा पूर्ण होईल.

Floral Pattern
Floral Pattern

कर्क - कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळा. अन्यथा पूर्ण होत आलेलं काम बिघडू शकतं. नियोजित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक मोठा खर्च उद्भवेल. त्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं.

Floral Pattern
Floral Pattern

सिंह - पैशांचा काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा नंतर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला जवळच्या पैशांतून चैनीच्या वस्तू खरेदी कराल किंवा घराची दुरुस्ती कराल. तुमचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सहभाग वाढेल. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना आठवड्याच्या शेवटी एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते.

Floral Pattern
Floral Pattern

कन्या - वाहन चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा शारीरिक इजा होऊ शकते. आहार आणि दिनचर्येकडे लक्ष द्या. याकडे दुर्लक्ष झालं तर रुग्णालयात जावं लागेल. तुम्हाला तुमच्या आईचीदेखील काळजी घ्यावी लागेल. इतरांच्या चुकीमुळे तुमच्या प्रेमसंबंधात दुरावा येऊ देऊ नका.

Floral Pattern
Floral Pattern

तूळ - आठवड्याच्या उत्तरार्धात घाईत किंवा गोंधळलेल्या मानसिकतेत मोठे निर्णय घेणं टाळा. अन्यथा नंतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधात अडचणी वाढू शकतात.

Floral Pattern
Floral Pattern

वृश्चिक - जोखमीच्या योजना किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवणं टाळा. अन्यथा आर्थिक नुकसान होईल. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात. तुलनेत उत्तरार्ध शुभ आणि भाग्यवर्धक असेल.

Floral Pattern
Floral Pattern

धनु - न्यायालयात जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर आणखी लांबवण्यापेक्षा वाटघाटीद्वारे संपवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून आठवडा शुभ आहे. आठवड्याच्या शेवटी व्यवसायाशी संबंधित एखादा सौदा कराल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल.

Floral Pattern
Floral Pattern

मकर - नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमध्ये चूक करणं टाळावं अन्यथा वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो.

Floral Pattern
Floral Pattern

कुंभ - आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध चांगला असेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीमुळे प्रलंबित कामं पूर्ण होतील. आर्थिक बाजू, नोकरी, व्यवसाय बळकट होतील. नोकरदार व्यक्तींना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळेल. व्यवसायात थोडा फायदा होईल.

Floral Pattern
Floral Pattern

मीन - तुम्हाला आळस आणि गर्व टाळावा लागेल. कामात अपेक्षित यश मिळवण्यासाठी स्वप्न बघण्याऐवजी मेहनतीवर भर द्या. करिअर किंवा व्यवसायात निष्काळजीपणामुळे काम बिघडू शकतं. हातातला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करा. प्रसंगी वयानं लहान असलेल्या व्यक्तींची याकरिता मदत घ्या.