इथं मिळतोय भट्टीतील तंदूर वडापाव

इथं मिळतोय भट्टीतील तंदूर वडापाव

मुंबईच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख स्ट्रीट फूड म्हटलं की सर्वांना वडापावच आठवतो. 

प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या वडापावची वेगळी खासियत असते. असाच एक फेमस वडापाव ठाण्यात आहे. 

अनेकदा भट्टीतला हा तंदूर वडापाव खाण्याचा मोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही होतो. 

2017 मध्ये अष्टविनायक कट्टा स्टॉलवर वीणा दाभोळकर यांनी वडापाव विक्री सुरू केली. 

सुरुवातीला वडापावसोबत, कांदाभजी, मूगभजी असे पदार्थ विकणाऱ्या विणाताईंनी तंदूर वडापाव सुरू केला.

मुंबईतील पहिला तंदूर-भट्टी वडापाव सुरू करण्याची कल्पना कोरोना लॉकडाऊनमध्ये गावी असताना सुचली. 

विशेष म्हणजे या स्टॉलवर तंदूर वडापावचे विविध प्रकार देखील मिळत असल्याने नेहमी गर्दी असते. 

तंदुरी चीज मेयो, बार्बीक्यू चीज, नाचोज चीज, कुरकुरे, चिप्स, पनीर वडापाव असे प्रकार येथे मिळतात. 

या वडापावची किंमत 50 रुपयांपासून सुरु होत असून ती प्रकारानुसार भिन्न आहे. 

पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रांगा