कॅनव्हासवर अवतरली हुबेहुब जुनी मुंबई

कॅनव्हासवर अवतरली हुबेहुब जुनी मुंबई

सध्याची मुंबई आणि जुनी मुंबई यामध्ये मोठं अंतर असून या स्थित्यंतराचं सर्वांनाच आकर्षण असतं. 

चित्रकार अमन यांनी कॅनव्हासवर हुबेहुब जुनी मुंबई साकारली असून यातून मुंबईचं बदललेलं चित्र दिसतंय. 

कुलाबा येथील जहांगीर कला दालनात नुकतंच अमन यांच्या चित्रांचं विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं.

अमन यांनी मुंबईतील प्रत्येक गोष्ट आपल्या चित्रांत अगदी बारकाईने टिपली आहे. 

जुन्या मुंबईतील चित्रांमध्ये मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ बारकाईने दाखवलीय. 

गेट वे समोरचं तेव्हाचं वातावरण, जुनी बस, घोडागाडी असं सगळं अगदी हुबेहुब दाखवलं आहे. 

अमन यांनी रेखाटलेल्या मुंबईवरील 3 चित्रांना राज्य शासनाच्या गॅझेटच्या 3 खंडांवर स्थान मिळालंय.

'बॉम्बे सिटी ऑफ आयलंड 2011' या गॅझेटची कव्हर म्हणून ही चित्रे वापरली जाणार आहेत. 

ठाकरेंच्या टीमचं मोठं यश, शोधली नवी प्रजाती