10 प्रकारचे चहा फ्लेवर एकाच ठिकाणी

10 प्रकारचे चहा फ्लेवर एकाच ठिकाणी

चहाला वेळ नसते पण वेळाला चहा हा हवाच असं म्हटलं जात. अनेक चहा प्रेमी हे आपण आपल्या आजू बाजूला पाहत असतो.

पुणे शहरात चहासाठी फेमस असलेली अनेक ठिकाण आपल्याला माहिती असतील.

पण पुण्यातील जे. एम. रोड परिसरात असणाऱ्या चहा आणि बार या कॅफेमध्ये अनोखे प्रकारचे चहा फ्लेवर हे पाहिला मिळतात.

आणि त्याची टेस्ट देखील अप्रतिम अशी आहे. यामध्ये 10 प्रकारचे चहा फ्लेवर प्यायला मिळतात.

पुण्यातील जे. एम. रोड परिसरात असणाऱ्या चहा आणि बार या कॅफेचे मालक ओंकार रेणुसे आहेत.

या कॅफेमध्ये इलायची, आद्रक, चॉकलेट, रोझ, पान, स्पेशल मसाला, बटर स्कॉच, ब्लॅक टी, लेमन टी असे 10 प्रकारचे चहा फ्लेवर मिळतात.

याची किंमत 12 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती कॅफेचे मालक ओंकार रेणुसे यांनी दिली आहे.

पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रांगा