40 रुपयांत खा प्रसिद्ध समोसा राईस 

40 रुपयांत खा प्रसिद्ध समोसा राईस 

आपला भारत देशात प्रत्येक शहराची वेगळी अशी एक खाद्य संस्कृती आहे. त्याचबरोबर शहरात मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये देखील आपल्याला वैविध्य आढळते.

जालना शहरामध्ये रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये समोसा राईस हा पदार्थ लोकप्रिय आहे.

हा समोसा राईस खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

42 वर्षीय बालाजी घोडके यांनी 2018 मध्ये मिसळ पाव आणि रस्सा पोह्याचा हा स्टॉल सुरू केला.

त्यांना मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्यांनी एक एक खाद्यपदार्थ आपल्या स्टॉलवर वाढवत नेला.

त्यांच्याकडे केवळ 40 रुपयांमध्ये हा समोसा राईस मिळतो.

समोसा प्लेटमध्ये चुरून त्यावरती खमंग असा राईस टाकला जातो. 

त्यावरती तर्रीदार मटकीचा रस्सा, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि वरून बारीक शेव अशा पद्धतीने समोसा राईस तयार होते.

पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रांगा