किलोवर कपडे मिळणारं चिंधी मार्केट

किलोवर कपडे मिळणारं चिंधी मार्केट

ठाण्यातील चिंधी मार्केट कपड्यांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी चक्क किलोवर कपडे मिळतात. 

30 ते 40 रुपयांतात या चिंधी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिझायनर फॅब्रिक मिळतात. 

त्यापासून साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता. 

डोंबिवली जवळील गोळवली या गावात हे चिंधी मार्केट असून स्टेशनपासून फक्त 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. 

एका छोट्याशा गल्लीमध्ये हे मार्केट वसलेलं असून गल्लीत प्रवेश केल्यावर छोटी छोटी दुकाने आहेत. 

चिंधी मार्केटमध्ये पूर्वी डोंबिवली एमआयडीसी येथून आलेले काही कट पिसेस विक्रीसाठी येत असतं. 

त्यावेळी विविध रंगातील फॅब्रिक विकले जात असे, तेव्हापासून या मार्केटला चिंधी मार्केट असं म्हटलं जातं.

आता या मार्केटमध्ये सुरतहून तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून फॅब्रिक मागवत असल्याचं विक्रेते सांगतात.

कॅनव्हासवर अवतरली हुबेहुब जुनी मुंबई