विहीर नव्हे हा तर 'छत्रपतीं'चा राजवाडा

विहीर नव्हे हा तर 'छत्रपतीं'चा राजवाडा

एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर असणाऱ्या साताऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. 

सातारा तालुक्यातील लिंब येथे 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद एक पुरातन विहीर आहे. 

विशेष म्हणजे ही शिवकालीन विहीर साधीसुधी नसून या विहिरीत एक राजवाडा आहे. 

छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आल्याचे आणि त्यांच्या गुप्त बैठका झाल्याचे संदर्भ आढळतात. 

स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असणाऱ्या या विहिरीला 12 मोटेची विहीर म्हणूनच ओळखले जाते.

1641 ते 1645 दरम्यान बांधलेल्या या विहिरीला 15 मोटी आहेत पण यातील 12 च वापरात होत्या.

या विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी आणि आड आहे. 

या विहिरीला वरून  पाहिल्यास शिवलिंगाचा आकार तर बाजूने पाहिल्यास अष्टकोनी आकार दिसतो.