टीव्हीच्या पार्वतीचं धुमधडाक्यात लग्न!

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदोरिया आज लग्नबंधनात अडकणार आहे.

तिला 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळाली.

 ग्लॅमरच्या जगापासून दूर असलेली सोनारिका सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.

 अभिनेत्रीच्या घरी लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे.

सोनारिका आता आयुष्यात नवी सुरुवात करत आहे.

 ही अभिनेत्री रणथंबोरमध्ये विकास पराशरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

सोनारिकाने मेहंदीमध्ये उजव्या हातावर 'शिव-पार्वती' काढले होते.

 गडद लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेली सोनारिका एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती.

सोनारिकाला आता चाहते शुभेच्छा देत आहेत.