सुहानी भटनागर ते तुनिषा शर्मा; अल्पायुषी ठरले हे कलाकार

सुशांत सिंग राजपूतचं जून 2020 मध्ये अवघ्या 34 व्या वर्षी दुःखद निधन झालं. 

 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती अल्पावधीतच हिट झाली होती.

25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या दिव्याचा अवघ्या 19 व्या वर्षी बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता.

नुकतंच दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचा वयाच्या  19 व्या वर्षी गंभीर आजारामुळं निधन झालं.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 20 व्या वर्षी अली बाबा शोच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली होती.

तिच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

अभिनेता आदित्य सिंह राजपूत मे 2023 मध्ये मुंबईतील अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तो फक्त 32 वर्षांचा होता.

25 वर्षीय जिया खान जून 2013 रोजी मुंबईतील जुहू येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती.

'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीने अवघ्या 24 व्या वर्षी गळफास घेत जीवन संपवलं.