अनोख्या माश्याविषयी माहितीय का? ज्याचे रोज तुटतात 20 दात

पॅसिफिक लिंगकॉड असं या माश्याचं नाव आहे. हा मासा खूप विचित्र आहे. 

या माश्याच्या तोंडात 500 पेक्षा तीक्ष्ण दात असतात.

हा मासा पुढच्या दातांनी भक्ष पकडतो आणि मागच्या दातांनी चावतो. 

या माश्याचे दात दररोज तुटताता आणि रोज नव्यानं वाढतात. 

दररोज या माश्याचे 20 दात तुटतात. आणि नवे 20 दात येतात. 

वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. कोहेन यांनी सांगितलं की, या माशांचा प्रत्येक पृष्ठभाग दातांनी झाकलेला असतो. 

त्यांचा जबडा माणसांप्रमाणेच असतो मात्र तो अधिक लवचिक असतो. 

तीक्ष्ण दातांनी शिकार केल्यावर ते कमकुवत होतात.

भक्ष्याला घट्ट पकडल्यावर त्यांचे दात झिजतात आणि पडतात.