साताऱ्यातील संगम माहुली हे धनंजय शिवाजी मोहिते यांचे गाव आहे. पुणे येथून 2015 मध्ये एमसीएची पदवी घेतली.
त्यानंतर धनंजय यांनी पुणे येथील आयटी कंपनीत ग्राफिक डिझाईन विभागात नोकरी सुरु केली. मात्र, वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून त्यांना घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी गावी यावे लागले.
वडिलोपार्जित असणाऱ्या एक एकर शेतीमध्ये वडील हे ऊसाचे पीक घेत होते. शेती फक्त एक एकरच त्यातूनच घरची जबाबदारी त्यामुळे अनेक आव्हान त्यांचा समोर होती.
त्यामुळे कमी गुंतवणूक असलेल्या रेशीम शेतीचा हा उत्तम व्यवसाय आहे हे त्यांच्या अभ्यासातून निदर्शनात आले. त्यामुळे धनंजय यांनी रेशीम शेती करण्याचा पर्याय निवडला.
त्यांनतर त्यांनी वडिलोपार्जित एक एकर क्षेत्राचा वापर करून शेतात तुतीच्या झाडाची लागवड केली.
त्याचबरोबर 50 बाय 20 फुट लांबी रुंदीचे शेड बांधून सुरू केला रेशीम उद्योग सुरु केला.
रेशीम शेतीमधून ते एका बॅचला 40 ते 45 हजार रुपये एवढे उत्पन्न ते घेत असतात. यामधून त्यांना वर्षांकाठी लाखोंची कमाई होत आहे.