यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल किचनमधील एक पदार्थ

सध्या अनेकजणांना यूरिक ऍसिड वाढण्याची समस्या जाणवते.

यूरिक ऍसिड वाढल्याने सांधे आणि हाडांमध्ये वेदना वाढू लागतात आणि शरीरातील विविध भागांवर सूज निर्माण होत असल्याची तक्रार अनेक लोक करतात.

शरीरातील यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी ओवा प्रभावी ठरू शकतो.

यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय लाभदायक ठरतात.

ओव्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे यूरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

सकाळी एक ग्लास पाण्यात ओवा टाकून उकळवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने यूरिक ऍसिड कमी होऊ शकते.

सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.