तरुण करतोय कचोरी विकून दिवसाला अडीच हजार रुपयांची कमाई 

तरुण करतोय कचोरी विकून दिवसाला अडीच हजार रुपयांची कमाई 

आपल्याकडे फास्ट फूडचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शेगावची कुरकुरीत कचोरी होय. 

 जालना शहरात खवय्यांना केवळ पाच रुपयांमध्ये शेगाव कचोरी खायला मिळतेय.

शहरातील शनी मंदिर चौकामध्ये कैलास गायकवाड या तरुणाने शेगाव कचोरी सेंटर सुरू केले आहे.

केवळ आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या कैलासची दिवसाची उलाढाल 5 हजारांवर आहे. तर दिवसाला 2 ते अडीच हजार रुपयांची निव्वळ कमाई करतोय.

कैलास गायकवाड हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथील रहिवासी आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालं.

त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या अंगावरती आली. लहान असतानाच तो हॉटेल व्यवसायामध्ये शिरला.

छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल अकरा वर्ष त्यांनी या व्यवसायामध्ये काम केलं. त्यानंतर आता जालना शहरात त्याने स्वतःचा शेगाव कचोरीचा स्टॉल सुरू केला आहे.

केवळ 5 रुपयांमध्ये खवय्यांना कुरकुरीत स्वादिष्ट कचोरी या ठिकाणी चाखायला मिळते. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे दररोज 5 ते 6 आजारांची आर्थिक उलाढाल होते. 

यातून दोन ते अडीच हजार निव्वळ नफा राहत असल्याचे कैलास गायकवाड यांनी सांगितलं.

हमाल कसा झाला उद्योगपती?