तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि अंत्यत पूजनीय मानले जाते

 तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळतो. 

तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सुख-समृद्धी नांदते.

घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवून त्याची पूजा नियमानुसार केल्यास विशेष फळ प्राप्त होते.

तुळशीची पूजा स्नान केल्यानंतरच करावी. तुळशीला जास्त पाणी देऊ नये.

शास्त्रानुसार सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करणे शुभ असते. 

रविवारी आणि एकादशीलाही तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई आहे.

तुळशीपूजेच्या वेळी जल अर्पण करताना तुळशी मंत्राचा जप अधिक फलदायी असतो.

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि शांती नांदते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. 

मंत्र- महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते…