रात्री झोपेत घाम फुटणे 5 गंभीर आजारांचे लक्षण

शरीराच तापमान वाढल्यावर घाम येणं सामान्य गोष्ट आहे. परंतु कुठल्याही कारणाशिवाय रात्री घाम येणे हे काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

तज्ज्ञ सांगतात जर कोणाला रात्री झोपल्यावर सतत घाम येत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता अशा रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

शरीरातील साखरेची पातळी कमी झाली की घाम येतो. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

वाढत्या वयात महिलांना मेनोपॉज सुरु होतो. अशावेळी शरीरात होणाऱ्या बदलांमुळे रात्री घाम येऊ शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी जर व्यक्तीने दारू प्यायली असेल तर त्याला झोपताना घाम येऊ शकतो. कारण दारू प्यायल्याने हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात त्यामुळे घाबरल्या सारखे होते आणि घाम येतो.

अतिरिक्त ताणतणावामुळे रात्री झोपताना अनेकदा घाम येतो.

रात्री झोपण्यापूर्वी गोळ्या खाल्ल्यामुळे देखील शरीराला घाम येऊ शकतो. काहीवेळा औषधांच्या प्रभावामुळे घाम येऊ शकतो.

जर तुम्हाला झोपल्यावर खूप घाम येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार करून घ्या.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहेत. तेव्हा आरोग्याशी निगडित कोणत्याही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा