उन्हाळ्यात केसांसाठी आरोग्यदायी कोरफड

उन्हाळ्यात केसांसाठी आरोग्यदायी कोरफड

उन्हाळ्यात आरोग्य आणि केसांशी संबंधित समस्यांवर कोरफड हा एक चांगला उपाय आहे. 

वर्धा येथील ब्यूटीशियन धनश्री भांडेकर यांनी कोरफडीबाबत माहिती दिली आहे. 

उन्हाळ्यात केसांमध्ये स्काल्पवर घामोळ्या होणे आणि इतर समस्यांवर कोरफड फायदेशीर ठरू शकते. 

कोरफडीचा आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.

कोरफडीच्या पानाचा गर काढून तो थेट पॅक स्वरुपात स्काल्पवर लावल्यास लाभदायी ठरतो. 

कोरफडीचा गर आणि त्यात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट, थोडे दही, 2 थेंब लिंबू रस असे एकत्र करून घ्यायचे. 

केसांना मेहंदी लावतात त्याप्रमाणे लावून हा पॅक 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि सौम्य शाम्पूने धुवून घ्या.

 कोरफडीचा गर आणि त्यात खोबरेल तेल ऍड करून थोडं कोमट करायचं. त्याचा केसांच्या मुळाशी मसाज करावा. 

कोरफडीच्या वापरामुळे फंगल इन्फेक्शन, घामोळी किंवा घामापासून होणाऱ्या समस्या आणि उवा सुद्धा निघून जातत. 

हे मसाले खाल्ल्यास उजळेल भाग्य