14 प्रकारच्या बिस्किटांमधून महिलेची लाखोंची कमाई

14 प्रकारच्या बिस्किटांमधून महिलेची लाखोंची कमाई

एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, असं म्हटलं जातं. पण एखादा पुरुष स्त्रीच्या मागं खंबीरपणे उभा राहिला तर काय घडू शकतं याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असणाऱ्या क्षेत्र माऊली येथील मेघा कुंभार यांची कोरोना काळात नोकरी गेली. तेव्हा पती धनंजय कुंभार यांनी पत्नीला पौष्टिक बिस्कीट बनवण्याच्या उद्योगासाठी साथ दिली.

14 प्रकारचे बिस्कीट बनवत ‘दिव्यांक कुकीज’ या ब्रँडच्या माध्यमातून कुंभार दाम्पत्य लाखोंची कमाई करत आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात कुंभार दाम्यत्याची नोकरी गेली. तेव्हा मेघा कुंभार यांनी पतीसह स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्धार केला.

विविध 14 प्रकारच्या बिस्कीटांची निर्मिती सुरू केली. या पौष्टिक बिस्कीटांना मागणी वाढल्याने दिव्यांक कुकीज हा बिस्कीटांचा ब्रँड बनला आहे.

गव्हाचे बिस्किट, नाचणीचे बिस्किट, ओट्स बिस्किट, तृणधान्य बिस्कीट असे विविध प्रकारचे बिस्कीट बनवतात. तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिऱ्याचे, जीराचे, त्याचबरोबर डायट बिस्किटही बनवली जातात.

14 प्रकाराचे बिस्कीट पूर्णपणे मैदा विरहित पौष्टिक आहेत. 100 ग्रॅम गव्हाच्या बिस्किटाला 30 रुपये दर, तर 100 ग्रॅम मिल्क कुकीजला 70 रुपये दर आहे.

त्याचबरोबर 300 रुपये किलो ते 700 रुपये किलो पर्यंत या बिस्किटांची विक्री केली जाते. महिन्याला 150 ते 200 किलो बिस्किटांची विक्री करून तब्बल वार्षिक 6 लाख रुपये पर्यंत नफा ते मिळवत असतात.

हमाल कसा झाला उद्योगपती?