तुकतुकीत त्वचेसाठी दह्याचं बेस्ट फेस पॅक!

दह्यात असतं लॅक्टिक ऍसिड. ज्यामुळे त्वचा मूळापासून होते स्वच्छ.

रखरखीत त्वचेवर दह्यामुळे येतो तुकतुकीतपणा.

दह्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही होतात हळूहळू कमी.

एका वाटीत दोन चमचे दही घ्या, त्यात चमचाभर मध मिसळा.

ही पेस्ट पूर्ण चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा.

20 मिनिटं ती तशीच राहूद्या. 

मग साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या.

आंघोळीच्या आधी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.