शेतकऱ्याने पिकवला 9 ते 12 इंच लांब ओंबीचा गहू 

शेतकऱ्याने पिकवला 9 ते 12 इंच लांब ओंबीचा गहू 

शेती क्षेत्रापुढे विविध आव्हाने असताना देखील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतच असतात. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच प्रयोग केला आहे.

 पाच ते सहा इंच लांबीची ओंबी असलेला गहू आपल्या परिचयाचा आहे. मात्र पारनेर येथील एका शेतकऱ्याने तब्बल 9 ते 12 इंच लांब ओंबी असलेला अमेरिकन व्हरायटीचा गहू पिकवला आहे.

पापालाल भिकूलाल लाहोटी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मध्य प्रदेशात एका नातेवाईकाकडून त्यांनी हे बियाणे मागवले आहे.

विशेष म्हणजे एका ओंबीमध्ये 100 ते 110 गव्हाचे दाणे निघतात. त्यामुळे एकरी 30 क्विंटल गव्हाचे उत्पन्न निघत असल्याचे लाहोटी सांगतात.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे वास्तव्यास असलेल्या लाहोटी यांची पारनेर शिवारामध्ये 14 एकर शेत जमीन आहे. 

मागील वर्षी त्यांनी मध्य प्रदेशातील एका नातेवाईकाकडून 2 किलो अमेरिकन व्हरायटीच्या गव्हाची बियाणे आणले होते. अर्धा एकर क्षेत्रावर त्याची टोकन पद्धतीने त्याची लागवड केली.

यामधून त्यांना 15 क्विंटल 85 किलो गव्हाचे उत्पादन झाले. त्यामुळे यावर्षी त्यांचा आत्मविश्वास वाढला.

गतवर्षी उत्पादित झालेल्या गव्हाचे बियाणे म्हणून वापर करत लाहोटी यांनी 4 एकर वर टोकन पद्धतीने लागवड केली. यासाठी दोन फुटांच्या सऱ्यादेखील पाडण्यात आल्या.

टोकण यंत्राच्या साह्याने एका जागी चार ते पाच गहू लावण्यात आले. आता हा गहू अतिशय बहारात आला असून गव्हाच्या ओंबीची लांबी 9 ते 12 इंचाच्या आसपास आहे.

हमाल कसा झाला उद्योगपती?