सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ, फक्त वापरा 'या' टिप्स

मऊ चपाती खायला सर्वांनाच आवडते. तेव्हा तुम्ही केलेली चपाती जास्तवेळ मऊ कशी राहील याविषयी जाणून घेऊयात.

चपाती दीर्घकाळ मऊ राहाव्यात असं वाटतं असेल तर तुम्ही पीठ मळताना त्यात तेल किंवा मलाई टाका.

पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा यामुळे चपाती मऊ राहते.

मीठ आणि  दूध टाकून पीठ मळल्यास चपात्या जास्तकाळ मऊ राहतील.

चपात्या तयार झाल्या की त्या फॉईलमध्ये रॅप करण्यापूर्वी सुती कपड्यावर ठेवा.

चपात्या शेकवत असताना त्याच्या मध्यभागी तूप टाका. यामुळे चपात्या दीर्घकाळ मऊ राहतील.

चपात्या पुन्हा एकदा गरम करायच्या झाल्यास त्या मायक्रोवेव्ह ऐवजी तव्यावर गरम करून खावा.

चपात्या डब्यात ठेवताना त्याच्या खाली सॉफ्ट फोम सारखा सुती कपडा टाका.

या टिप्सचा वापर केल्यास चपात्या दीर्घकाळ मऊ राहतील.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा