हिरे चाटल्याने  मृत्यू होतो?

हिरा हा एक अत्यंत सुंदर आणि पारदर्शक रत्न आहे.

हा सर्वात मजबूत रत्न असतो, असं म्हणतात.

हिऱ्याबाबत लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज असतात.

जसं की, हिरा चाटल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो.

शास्त्रज्ज्ञ सांगतात की, यात काही तथ्य नाही.

हिरे म्हणजे कार्बनचं एक रूप. 

यात कोणत्याही प्रकारचं विष नसतं.

त्यामुळे हिरे चाटल्याने कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही.

जर एखाद्या व्यक्तीने हिरा खाल्ला, तर मात्र ते तिच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं.