2 मुलांमध्ये किती वर्षाचं अंतर असायला हवं?

प्रेग्नेंसी प्लॅन करताना आपल्या दोन्ही मुलांच्या वयात किती वर्षाचं अंतर असावं याबाबत पालक अनभिज्ञ असतात.

प्रेग्नेंसी प्लॅन करत असाल तर आईच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे.

जर आई पूर्णपणे स्वस्थ नसेल तर दुसऱ्या प्रेग्नेंसीचं प्लँनिंग करू नये.

दोन्ही प्रेग्नेंसीमध्ये 12 महिन्यांचं अंतर आईसाठी धोकादायक ठरू शकते.

WHO नुसार दोन मुलांमध्ये 24 महिन्यांचे अंतर असायला हवे.

24 महिन्यांचे अंतर असल्याने आईची तब्बेत देखील पूर्णपणे सुधारते आणि स्वस्थ होते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर दुसरे मुलं करायचेच असेल तर त्यात कमीतकमी १८ महिन्यांचं अंतर असायला हवं.

18 महिन्यांपेक्षा कमी अंतर असलेले मुलं वजनाने कमी असू शकते.

जर पहिल्या डिलिव्हरीवेळी आईचे सी सेक्शन झाले असेल तर दुसरी प्रेग्नेंसी प्लॅन करताना अधिक काळजी घ्यावी.

दोन प्रेग्नेंसीमध्ये जर योग्य अंतर नसेल तर आईच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो.

अनेक कपल आपल्या दोन मुलांमध्ये 3 वर्षांचे अंतर ठेवतात आणि प्रेग्नंन्सी प्लॅन करतात.

याच कारण म्हणजे पहिलं मुलं तीन वर्षाचं झालं असेल तर ते हळूहळू त्याची काम करू लागत आणि आई वडील दुसऱ्या मुलाकडे अधिक लक्ष देऊ  शकतात.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा